आजरा : पोश्रातवाडीचा नावलौकिक जयराम संकपाळ यांनी वाढविला : आमदार राजेश पाटील

आजरा प्रतिनिधी/पुंडलीक सुतार
पोश्रातवाडी ता.आजरा येथील सुपुत्र जयराम संकपाळ हे एक निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते आहेत ते प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या कामाची पद्धत पाहून त्यांची तालुका संघाने तज्ञ संचालक पदी निवड केली यामुळे त्यांच्या माध्यमातून गावच्या नावलौकिकात भर पडली असल्याचे मत आमदार राजेश पाटील यांनी जयराम संकपाळ यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
अध्यक्ष स्थानी बाबासाहेब पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी हे होते.या पुढे बोलताना सुधीर भाऊ देसाई संचालक केडीसीसी बँक म्हणाले की जयराम संकपाळ यांच्यातील सामाजिक कार्याची तळमळ पाहून तसेच एखादया लहान गावाला सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी त्यांना पद बहाल केल्याचे यावेळी सांगितले.
पुढे बोलताना सत्कारमूर्ती जयराम संकपाळ म्हणाले की मला मिळालेल्या संधीचा गावच्या व संघाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करीन असे सांगितले.ग्रामस्थांच्या वतीने तज्ञ संचालक जयराम संकपाळ यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी अथर्व संकपाळ यांचाही वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी तालुका संघाचे व आजरा कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांचा यावेळी संकपाळ परिवाराच्या वतीने सत्कार झाला तर उपस्थित मान्यवरांच्या वतीनेही तज्ञ संचालक जयराम संकपाळ यांचा सत्कार झाला.प्रास्ताविक तानाजी राजाराम यांनी केले.आभार दिनकर देसाई यांनी मानले.यावेळी सर्व ग्रामस्थ व विविध संस्था चे पदाधिकारी व सर्व सदस्य तसेच तरुण मंडळा चे पदाधिकारी व सर्व सदस्य हजर होते.