ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आजरा : कोळिंद्रे येथे भक्ती गीतांचा कार्यक्रम उत्साहात

आजरा प्रतिनिधी/पुंडलीक सुतार
कोळिंद्रे ता.आजरा येथे श्री विठ्ठल रुखमाई हरिनाम सप्ताह निमित्त भाव भक्ती गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.या मध्ये मुंबई येथील गायक गोपाळ उंडगे पाटील यांनी गीत रामायण मधील गीतांचे उत्कृष्ठ गायन केले तर सह कलाकार सुरेश पाटील,रमेश पाटील ,जितेंद्र कांबळे, एस के,आदी गायक कलाकार यांनी अभंग,भक्ती गीते गायन करून प्रेक्षकांची मने जिंकली.