महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पन्हाळा तालुका अध्यक्षपदी अनिल सुतार यांची निवड

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकरिणीचा विस्तार येथील दसरा चौक येथे संघाच्या कार्यालयात पार पडला.त्यामध्ये अनिल बाळू सुतार यांची पन्हाळा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.याबदल त्यांच्यावर तालुक्यातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यावेळी आगामी काळात पत्रकारांना ना नफा ना तोटा या तत्वावर सदनिका देण्याबरोबरच विविध योजना राबवून पत्रकार बांधवांसाठी कुटुंबकल्याण संस्थेची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे यांनी दिली.या कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयस भगवान यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच कोल्हापूर जिल्ह्यात 12 तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.सर्व पदाधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.तसेच येणाऱ्या काळात पत्रकार बांधवांच्या साठी संघटन मजबूत करण्याची ग्वाही सर्व पदाधिकारी यांनी दिली.
सामाजिक,राजकीय स्तरावर पत्रकार बांधवाना मानसन्मान मिळवून दर्जात्मक काम करण्यासाठी मजबूत व्यासपीठ यानिमित्ताने निर्माण होत आहे.त्यामुळे प्रथमच पत्रकार बांधवांसाठी एक आश्वासक व्यासपीठ या माध्यमातून उभे राहत आहे.पत्रकारिता आज एक वेगळ्या वळणावर पोचली असून आता एकसंघ राहण्याची गरज निर्माण झाली आहे.संघटन मजबूत असेल तर मजबूत पत्रकार नक्कीच घडेल असा सूर या कार्यक्रमात दिसून आला.पत्रकारांच्या मेडिक्लेम संदर्भात यावेळी चर्चा झाली.
संस्थापक संजय भोकरे व प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची वाटचाल सुरू असून चांगले उपक्रम राबविण्याचा मानस सर्वच पदाधिकारी यांनी दिला.सदरच्या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयस भगवान,जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे, जिल्हा सचिव नवाब शेख,जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील,राजेंद्र मकोटे, कृष्णराज गिरी,सुभाष माने,बबलू मुल्ला तसेच जिल्ह्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते.