मोठी बातमी : राज्यात 17 हजार पोलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया आजपासून सुरु

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे ही त्यांच्यासाठी मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. काही महिन्यांपूर्वीच राज्यात 17 हजार पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेची घोषणा ही करण्यात आली. घोषणा तर झाली मात्र, त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू न झाल्याने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. आता शेवटी या संदर्भात मोठे अपडेट हे पुढे आले. विशेष म्हणजे आता आजपासूनच या भरती प्रक्रिया ही सुरू होतंय.
आजपासून (5 मार्च 2024) तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही आरामात अर्ज शकता. आजपासून संपूर्ण राज्यभरात पोलिस शिपाई पदांसाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियसाठी अर्ज ही आरामात करू शकता.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. http://www.mahapolice.gov.in आणि policerecruitment2024.mahait.org या दोन साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल.
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय हे 18 आणि जास्तीत जास्त 28 असावे. ही भरती प्रक्रिया पोलीस शिपाई , पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची शारीरिक योग्यता चाचणी आणि लेखी परीक्षा ही घेतली जाईल. त्यानंतर उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. लेखी परीक्षा ही 100 मार्कांची घेतली जाणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 आहे.