ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार १० मार्च रोजी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासह सुसज्ज देखणी टर्मिनल इमारत साकारली आहे. येत्या दहा तारखेला याच नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत.
केंद्र शासनाने कोल्हापूरसह विविध ठिकाणच्या विमानतळाच्या विकासकामांसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापूर विमानतळाच्या विकास आणि विस्तारीकरणासाठी, खासदार धनंजय महाडिक यांनी विशेष पाठपुरावा केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, कोल्हापूर विमानतळाच्या नव्या आधुनिक आणि सुसज्ज टर्मिनल बिल्डिंगचा उद्घाटन सोहळा होईल.
कोल्हापूरसह पुणे, ग्वाल्हेर, जबलपूर, अलिगड, चित्रकुट, आजमगड, मुराबाद आणि आदमपूर या विमानतळावरही टर्मिनल भवन उभारण्यात आले आहे.