राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाला मंडलिक महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचा उत्स्फूर्त हातभार

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
रविवार दि. ०३ मार्च २०२४ हा दिवस संपूर्ण देशात ‘पोलिओ दिन’ म्हणून साजरा केला गेला. यामध्ये शासनाकडून सर्वत्र पल्स पोलिओ आभियान राबविण्यात आले. खेडोपाड्यातील अनेक बालकांनी याचा लाभ घेतला. सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील कॅडेटस्नीही या राष्ट्रीय अभियानात आपापल्या गावातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मदत करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले.
महाविद्यालयाच्या कॅडेटस्नी केनवडे, तुरंबे, सावर्डे बुद्रुक आणि करंजीवने इत्यादी भागातील आरोग्य विभागात जाऊन हे अभियान यशस्वी करण्यास आपले योगदान दिले. यामध्ये आदित्य दत्तात्रय तहसिलदार, कु. प्रतिक्षा राजेंद्र परीट, करण तानाजी सुतार, कु. अनुराधा मारुती शिंदे, अमर मारुती पाटील, ऋषिकेश सुरेश शेटके, श्रीगणेश जयसिंग गुरव, कु. गायत्री सुदाम मसवेकर इ. कॅडेटस्नी उत्फूर्त सहभाग घेतला याबददल संबंधित गावचे पदाधिकारी, ग्रामस्थ व माता पालक व आरोग्य विभागाच्या पदाधिकारीव कर्मचारी यांनी महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेटसच्या या सहकार्याबद्दल खूप आभार मानले व कौतुक केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.डी. कुंभार, उपप्राचार्य प्रा. डॉ. टी. एम. पाटील व सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी या कार्याबद्दल एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान व सर्व कॅडेटस् यांचे कौतुक केले आणि सदिच्छा दिल्या.