कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जलरथाचे लॉन्चिंग ; जलरथाद्वारे जिल्हाभर होणार जनजागृती

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जलरथाचे लॉन्चिंग झाले. राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा हा रथ संपूर्ण जिल्हाभर फिरून “पाणीपुरवठा व स्वच्छता” या विषयावर जनजागृती करणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा -२ , गाळमुक्त धरण व जलयुक्त शिवार या योजनेविषयी जनजागृतीसाठी राज्यस्तरावरून कौटिल्य मल्टीक्रिएशन मार्फत जलरथ तयार करणेत आले आहेत. या जलरथाच्या माध्यमातून गावस्तरावर जनजागृती मोहिम राबविली जाणार आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी नगराध्यक्ष नवल बोते, जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक सौ. माधुरी परीट, कागलचे गटविकास अधिकारी सुशील संसारे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने आदी उपस्थित होते.