मुरगुड : स्वराज फौंडेशनच्या हळदी कुंकू समारंभाला महिलांचा उदंड प्रतिसाद

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
स्वराज्य फौंडेशनच्या वतीने मुरगुड परिसरात आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. मुरगुड येथे आज, गुरूवारी सायंकाळी हा सोहळा पार पडला. या वेळी महिलांना वाण म्हणून संसरोपयोगी साहित्य देण्यात आले.
त्यानंतर स्वराज फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदा प्रकाश रामाणे यांच्या हस्ते महिलांना वाण वाटप करण्यात आले. तत्पूर्वी उखाणे, प्रश्न मंजुषा, गायन यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी महिलांनी विविध कलागुण सादर केले. त्यात जेष्ठ महिला आणि नव विवाहित महिलांच्या उखाण्यांनी रंगत आणली. उपस्थित महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
मुरगुड मधील पाटील कॉलनी येथील स्वराज्य जनसंपर्क कार्यालय येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी मुरगुड परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांमधील स्नेह आणि गोडवा कायमचा टिकावा, या उद्देशाने तिळगुळ वाटप आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.स्वराज्य फौंडेशनच्या अध्यक्षा शारदा प्रकाश रामाणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी नंदा रामाणे, वैष्णवी लाड, शिवानी महाजन, ऋतुजा रामाणे, आनंदी लाड , संगीता रामाणे यांची प्रमूख उपस्थिती होती.