किल्ले पारगडावर ‘ सुभेदार रायबा मालुसरे’ यांच्या स्मारकाचे 25 फेब्रुवारी रोजी लोकार्पण

चंदगड प्रतिनिधी : रुपेश मऱ्यापगोळ
किल्ले पारगडाचे पहिले किल्लेदार सुभेदार रायबा तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. सुभेदार मालुसरे यांचे हे देशातील पहिले स्मारक ठरणार आहे. 4 फेब्रुवारी 1670 मध्ये सिंहगडाच्या लढाईत तानाजी मालुसरे शहीद झाल्यानंतर छत्रपती शिवरायांनी दक्षिणेच्या मोहिमेवर असताना या गडाची निर्मिती केली व मालुसरे यांची किल्लेदार म्हणून नेमणूक करून किल्ला त्यांच्या ताब्यात दिला व आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत गड रखा हा छत्रपती शिवरायांचा आदेश शिर सावंध मानून 500 मावळ्यासह स्वराज्यातील हा किल्ला अबद्य ठेवण्याचे कामगिरी सुभेदारांनी पार पाडली.
स्मारक स्थळी उभारण्यात येणाऱ्या रायबा मालुसरे यांच्या पुतळ्यासाठी ज्या चित्राचा वापर केला त्याच्या अनावर नुकतेच सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारक स्थळी करण्यात आले. यावेळी तानाजी व सूर्याजी यांचे बंधू व मालुसरे कुटुंबीय उपस्थित होते किल्ले पारगडावर येणाऱ्या पर्यटक व शिवभक्तांसाठी हे स्मारक माहिती स्त्रोत व प्रेरणास्थान ठरणार आहे. 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सोहळ्यात उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार व्हावे असे आवाहन समस्त मालुसरे परिवार व दुर्गप्रेमी शिवभक्तांनी केले आहे.