कागल येथे मनसेची पदाधिकारी बैठक पडली पार !

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुका पक्ष कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले आणि जिल्हाउपाध्यक्ष रोहन निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व कोल्हापूर लोकसभा संघटक तथा पक्षाचे सरचिटणीस बाळासाहेब शेडगे,संपर्कअध्यक्ष जयराज लांडगे व कागल विधानसभा संघटक प्रशांत मते यांच्या सूचनेनुसार पदाधिकारी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यासंदर्भात नियोजन पर महत्त्वाची बैठक पार पडली.
बैठकीत बोलताना जिल्हाअध्यक्ष नागेश चौगुले यांनी आगामी निवडणुकी लढवण्यासंदर्भात पुढील पक्ष वाढीच्या नियोजन संदर्भात मार्गदर्शन केले शाखा उभा करताना येणाऱ्या अडचणीवर तात्काळ मार्ग काढला आणि उपस्थित पदाधिकारी आणि सहकार्यांना उत्तम असे मार्गदर्शन केले.
जिल्हाउपाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी बोलताना सांगितले कागल तालुक्यात सहकाराचे जाळे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुमच्याकडे शाखा उभ्या करताना कुणी नोकरी मागण्यासाठी आले तर त्याचा बायो डेटा आपल्या कागलच्या पक्ष कार्यालयात जमा करायला सांगा आपण त्यांना नोकरी उपलब्ध करून देऊ तसेच निराधार माता-भगिनींना ज्यांना कुणाला पेंशन मिळत नाही त्यांचे अर्ज घ्या आपण त्यांना पेंशन चालू करून देऊ,शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घ्या तुमच्या स्तरावर प्रश्न सुटणार हे नक्कीच त्यातून जी मदत लागेल ते सांगा आम्ही प्रशासनाला धारेवर धरून संबंधित शेतकऱ्याचा प्रश्न निकाली काढायला सांगू आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ असा विश्वास मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी दिला.
या बैठकीत तालुकाध्यक्ष कागल पूर्व विनायक आवळे तालुकाध्यक्ष कागल पश्चिम सौरभ पोवार विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष शिवतेज विभुते, तालुका उपाध्यक्ष निखिल परीट, शहराध्यक्ष विनय पाटील, निखिल मोदी अरविंद सावंत, ओमकार भोजे, शुभम माळी ,अमोल आवळे, सचिन मोरे आणि नूतन पदाधिकारी उपस्थित होते.