ताज्या बातम्यामहाराष्ट्र
तुरंबेच्या सुमित सुर्यवंशीची राज्यस्तरीय पँटॅथलॉन स्पर्धेसाठी निवड -कोल्हापुर विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक !

तुरंबे प्रतिनिधी : अरुण भारमल
तुरंबे ( ता राधानगरी ) येथील श्री मारुतीराव विष्णू वारके (आबाजी ) विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी सुमित संजय सुर्यवंशी याने विभागीय पँटॅथलॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.त्याची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पँटॅथलॉन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.राज्यस्तरीय स्पर्धा ११ ते १३ फेब्रूवारी या कालावधीत होणार आहे.
सुमित सूर्यवंशी याची यापूर्वी जलतरण ,वैयक्तिक मिडले.स्पर्धेत राज्यस्तरीय निवड झाली आहे.सातारा येथे झालेल्या कोल्हापुर विभागीय पँटॅथलॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
त्याला संस्थेचे अध्यक्ष, क्रीडा शिक्षक हेमंत वारके यांचे मार्गदर्शन लाभले तर सचिव गौरव वारके,बिद्रीचे माजी संचालक रमेशराव वारके,वडील संजय सूर्यवंशी, मुख्याध्यापक एस के पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.