ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मांगुर फाटा येथे होणारा पूल पिलर वरीलच व्हावा ; राजे समरजितसिंह घाटगे यांनी पुन्हा घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील यमगर्णी-सौंदलगा दरम्याच्या वेदगंगा नदीवरील मांगुर फाटा येथे होणारा पूल भरावाऐवजी पिलरचाच करावा यासाठी पाठपुरावा म्हणून शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी पुन्हा केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेतली.यावेळी त्यांचेसोबत खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.

मूळ इस्टिमेटमध्ये हा पूल भरावा टाकून होणार होता. परंतु भराव्याच्या पुलामुळे मोठ्या प्रमाणात महापुराच्या पाण्याचा फुगवटा होणार असलेने कर्नाटक व महाराष्ट्रातील जवळपास 25 ते 30 गावांचे नुकसान होणार आहे.त्यामुळे या परिसरातील गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी यास विरोध केला होता. व राजे समरजितसिंह घाटगे यांना भेटून मंत्री गडकरी यांच्याकडे भरावा ऐवजी पिलरच्या पूलासाठी प्रयत्न करण्याबाबत साकडेही घातले होते. त्यानुसार घाटगे यांनी स्वतः व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या माध्यमातून मंत्री गडकरी यांच्याकडे पाठपुरावा चालू ठेवला आहे.

श्री घाटगे सुरुवातीपासूनच यासाठी प्रयत्नशील असून, या कामाचा पाठपुरावा म्हणून आज पुन्हा ना.नितीन गडकरी यांची भेट घेतली.या भेटीत, या भरावाच्या कामास स्थगिती देत असल्याचे ना. गडकरी यांनी खात्रीपूर्वक सांगितले. तसेच यातील तांत्रिक बाबी तपासून त्याची पूर्तता त्वरित करावी अशा सूचना एन एच ए आई च्या अधिकाऱ्यांना फोनवरून लगेचच दिल्या. त्यामुळे येथे पिलरचा पूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यावेळी त्यांनी कागल येथेही कराडच्या धर्तीवर पूल उभारणे बाबतच्या मागणीबाबत ही मंत्री गडकरी यांचेबरोबर सविस्तर चर्चा केली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks