ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे : डॉ.टी.एम.पाटील

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या वतीने ‘स्कूल कनेक्ट’ संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शिवराज ज्युनिअर कॉलेज मुरगूड येथे हे अभियान राबविण्यात आले. यामध्ये बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. विदयार्थीकेंद्रीत शिक्षण धोरणाची मूलतत्त्वे परिणामकारकरित्या प्रत्यक्षात आणण्यासाठी अशा अभियानाची गरज आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी व त्याच्या कौशल्य विकासासाठी हे धोरण अत्यंत महत्त्वाचे आहे. यावेळी नविन शैक्षणिक बदलासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांचे शंका समाधान करण्यात आले.

प्रास्ताविकात प्रा.बी.डी.चौगले यांनी पारंपारिक शिक्षण याबद्दल माहिती दिली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कार्यवाह अण्णासाहेब थोरवत, प्राचार्य पी.डी.माने, उपप्राचार्य प्रा.एल.व्ही.शर्मा, प्रा. उदय शेट्टी उपस्थिती होते. आभार प्रा.पी.पी.पाटील यांनी मानले. यात सुमारे १५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks