सर्वसामान्यांना मिळणार ३०० युनिट मोफत वीज ; केंद्र सरकारची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचे शेवटचे अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आले.
यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडत सरकारच्या नवीन योजनांची यावेळी घोषणा केली. यामध्ये त्यांनी मोफत वीज देणार असल्याचे सांगत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४ च्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा उल्लेख केला. या योजनेअंतर्गत ज्यांच्या घरी सौर यंत्रणा बसवली आहे त्यांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार असल्याची मोठी घोषणा केली.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर या योजनेची घोषणा केली होती,तसेच अधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेंतर्गत देशभरातील एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्यात येणार आहेत.
देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा फायदा होणार आहे.खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेबाबत माहिती दिली होती.ट्विटरवर पोस्ट करत पंतप्रधानांनी ,
”या योजनेमुळे भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होईल. ”असे म्हटले होते.
त्यांनी ट्विटरवर लिहिले की,
“आज अयोध्येतील अभिषेकच्या शुभमुहूर्तावर,
भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी हा माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे. अयोध्येहून परतल्यानंतर प्रथम मी घेतलेला निर्णय असा आहे की आमचे सरकार १ कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवण्याचे उद्दिष्ट घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होणार नाही, तर भारताला स्वयंभू बनवेल.ऊर्जा क्षेत्रात अवलंबून.असे म्हटले होते.