ताज्या बातम्यामहाराष्ट्र
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी वर्षाचा अंतरिम बजेट केला सादर

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम बजेट संसदेत सादर केला आहे. यामध्ये त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत.
अंतरिम बजेटमधील महत्त्वाच्या घोषणा
येत्या पाच वर्षांच्या काळात देशात आणखी दोन कोटी घरांचे बांधकाम करणार
देशातील 40 हजार साधे रेल्वे डबे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या धर्तीवर विकसित करून वंदे भारतला जोडणार
कॅन्सर रोखण्यासाठी 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींचे लसीकरण करणार.
PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत
देशातील तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे सरकारचे उद्दीष्ट
सौरऊर्जेच्या माध्यमातून 300 युनिट वीज मोफत देणार
स्वावलंबनाला गती देण्यासाठी एक नवीन योजना सुरू करणार
आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य कवच अंगणवाडी सेविकांनाही लागू