ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूड मधील जनावरांच्या बाजारात सोयी-सुविधा उपलब्ध करा ; नगरपरिषदेला व्यापाऱ्यांचे निवेदन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगुड ता.कागल येथे शहरात दर मंगळवारी मोठा जनावरांचा बाजार भरतो.बाजारात तळ कोकण,कर्नाटक व महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणांहून येणाऱ्या जनावरांचा बाजार भरतो. बाजारात गायी, म्हशींचा मोठा व्यापार होत असतो.

तथापी गाई म्हशींना उभे करण्यासाठी किंवा वाहनातून चढ उतर करण्यासाठी ठिय्ये करणे आवश्यक आहे.त्याशिवाय बाजारात सर्वत्र दलदल पसरलेली असून त्यावर मुरूम टाकणे आवश्यक आहे.तसेच बाजारातील अंतर्गत रस्ते आणि पाण्याच्या टाक्या यांची सुविधा होणे गरजेचे आहे.जनावरांच्या बाजारामुळे नगरपरिषदेला चांगले महसुली उत्पन्न मिळते.त्यामुळे नगरपालिकेने ह्या सोयी – सुविधा बाजारात तातडीने उपलब्ध करव्यात.असे निवेदन जनावर व्यापारी व शेतकऱ्यांनी मुरगूड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घार्गे यांच्याकडे दिले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks