ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी : कोल्हापूर जिल्ह्यात 8 फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश लागू

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

मनोज जरांगे-पाटील हे अंतरवाली सराटी येथून मुंबईसाठी पायी दिंडी काढून मुंबई येथे आंदोलन करणार आहेत. जिल्ह्यातील मराठा आरक्षणातील पक्ष, संघटना या आंदोलनास पाठिंबा देणार आहेत, तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, उरुस, सण इ.साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी रात्रौ 12 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत.

हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविण्याच्या संदर्भात कामकाज करताना उपर्निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा, इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks