ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शिंदेवाडी येथे राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या वाटप

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष तसेच शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम विद्या मंदिर शिंदेवाडी तसेच विद्या मंदिर शाहूनगर येथील प्राथमिक शाळेच्या मुलांना वह्या तसेच खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दत्तामामा खराडे, रामचंद्र खराडे ,गुंडा पाटील ,मनोहर आवटे ,प्रमोद खराडे ,गणपती खराडे, वस्ताद एकनाथ शिंदे ,अशोक खराडे , समरजित खराडे ,संदीप खराडे, रामचंद्र कणसे ,साईराज गोधडे ,बबन वंदुरे ,निलेश खराडे, उत्तम मोरबाळे ,शंकर वंदुरे,विशाल आंगज यांचेसह शाहू ग्रुपचे कर्मचारी ,विद्यामंदिर शिंदेवाडीचे विद्यार्थी- विद्यार्थिनी ,शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.