ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी : मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाची पहिल्याच दिवशी मोबाईल ॲप बंद झाल्याने सर्वर ठप्प

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला आजपासून राज्यभरात सुरवात झाली आहे. मात्र, गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेली मोबाईल ॲप बंद पहिल्याच दिवशी बंद पडली आहे. आज दीड तासांपासून सर्वर ठप्प असल्याने सर्वेक्षणाचे काम थांबले आहेत. त्यामुळे वेळेत हे सर्वेक्षण कसे पूर्ण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने आज सकाळपासूनच सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली होती. गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सर्वेक्षण करणाऱ्या प्रगनकांच्या मोबाईलवर ॲप देण्यात आली असून, त्या माध्यमातून सर्वेक्षणाला सुरुवात झाली. परंतु आज दुपारपासून दीड तासापासून हे सर्वेक्षण अनेक ठिकाणी बंद पडल्याची माहिती मिळत आहे. सर्वेक्षण करणाऱ्या प्रगनकांना मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये लॉगिन होताना अडथळा येत आहे. त्यामुळे लॉगिन होत नाही. परिणामी हे सर्वेक्षण अनेक ठिकाणी बंद पडले आहे. छत्रपती संभाजीनगर सह अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी ही समस्या उद्भवल्यामुळे सर्वेक्षण ठप्प आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks