दौलतवाडी येथे राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील दौलतवाडी येथे दगडू शेणवी युवा मंच यांच्यावतीने श्रीमंत राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त दौलतवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास गुरव तर प्रमुख उपस्थितीत दौलतवाडीच्या सरपंच शितल जाधव तसेच संजय चौगले होते.या कार्यक्रमाचे संयोजक मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी हे होते.
यावेळी बिद्री कारखान्याचे माजी.व्हा.चेअरमन दत्तामामा खराडे तसेच मुरगुडचे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, मुख्याध्यापक उत्तम पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी अनंत फर्नांडिस, संजय चौगुले, विजय राजिगरे, अमर चौगले, राजेंद्र चव्हाण, प्रविण चौगुले, प्रशांत कुडवे, जयवंत पाटील, बाजीराव जाधव, संदिप जाधव , सुनिल जाधव , विनोद जाधव आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत सुरज मुसळे यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक उत्तम पाटील यांनी केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगदीश कांबळे यांनी केले तर आभार विशाल कांबळे यांनी मांडले.