मुरगुड मध्ये अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरांची स्वच्छता मोहीम

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम लल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुरगूड मध्ये शहरातील सर्व मंदिरांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.यात युवकांचा सहभाग अधिक आहे.नगर परिषदेचे सुध्दा सहकार्य मिळत आहे.शिवछत्रपतींच्या पुतळ्या समोरील आत्मरूप गणेश मंदिरा पासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे.
आवशक ते साहित्य नगर परिषद व स्थनिक सामाजिक संस्थांकडून उपलब्ध झाले आहे. सकाळी सहा वाजल्यापासून स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांतून देखील चांगला प्रतिसाद युवकांना मिळत आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष रा जेखान जमादार,अमर सणगर, विशाल सुर्यवंशी ,सर्जेराव भाट,राहुल शिंदे,संग्राम साळुंखे,धोंडीराम परिट,ओंकार पोतदार,प्रवीण मांगोरे,उध्दव मिरजकर,अक्षय पोतदार,संकेत शहा,प्रकाश पारिश्र्वाड,चेतन गवाणकर,बबन बार्देस्कर,भिकाजी कांबळे,प्रदीप कांबळे उपस्थित होते.