केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेवून आपली आर्थिक उन्नती साधा : डॉ. संजय पाटील

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
केंद्र व राज्य शासनाच्या योजना आम्ही आपल्या घरापर्यंत घेवून आलोय. त्या योजनांचा लाभ घेवून आपली आर्थिक उन्नती साधा असे आवाहन भारत सरकारचे रसायन व खत मंत्रालय विभागाचे संचालक डॉ. संजय पाटील यांनी केले.
सोनाळी (ता. कागल ) येथे मोफत गॅस वाटप, महिलांच्या हळदी कुंकू व शासकीय योजनेची मंजुरी पत्रक वाटप तसेच गुणवंताचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच तानाजीराव कांबळे हे होते.स्वागत किरण भिऊगडे यांनी तर प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य समाधान म्हातुगडे यांनी केले.
यावेळी बोलताना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील महिलांच्या अंगी गुणवत्ता आहे. त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांना उद्योजक बनविण्यासाठी प्रयत्न करू.
यावेळी समाधान म्हातुगडे म्हणाले, महा ई सेवा केंद्रातील सर्व दाखले, शासकीय योजनांचे ऑनलाईन अर्ज इ. कोणतीही फि न आकारता सर्व मोफत सेवा देत आहोत. गावातील एकही कुटुंबं शासकीय योजनेपासुन वंचित राहणार नाही.
यावेळी पंतप्रधान उज्वला योजनेतून लाभार्थ्यांना मोफत गॅस वाटप करण्यात आले. पेन्शन योजनासह इतर शासकीय योजनाची मंजुरीपत्र वाटप तसेच शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या गुणवंताचा सत्कार यावेळी करण्यात आला. प्रा.प्रकाश सुतार यांनी सहका-यांस सुमधुर गाणी गात उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. मानसी मोळक हिने मनोगत व्यक्त केले. महिलातून ड्रॉ पद्धतीने गीतांजली शेणवी यांना शेगडी व समीक्षा वठारकर यांना मानाची पैठणी मिळाली.
यावेळी जिल्हा नियोजनचे सदस्य सत्यजित पाटील, शाहूच्या संचालिका रेखाताई पाटील, भाजपा पंचायतराजचे कागल तालुकाध्यक्ष प्रा. शरद बोरवडेकर, उपाध्यक्ष समाधान म्हातुगडे, शुभांगी देसाई, प्रा. तुकाराम कुंभार, सरपंच तानाजी कांबळे, ग्राप सदस्या सुवर्णा भोसले, वंदना पाटील, प्रेमा कोरे, भारत गॅसचे किशोर पाटील,प्रकाश सुतार,बाळासो तापेकर, मधुकर भिऊगडे, एन डी चौगले, स्वप्नांली मोळक, सतीश भिऊगडे, बसवराज कोरे,के वाय धनवडे यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार समाधान तापेकर यांनी मानले.