ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मोठी बातमी : बृजभूषण सिंह यांना मोठा धक्का ; नव्या कुस्ती महासंघाची मान्यता केंद्र सरकारकडून रद्द

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. ज्यामध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले. या निवडीनंतर बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावलेल्या कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणावरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून नव्या राष्ट्रीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली आहे.