ताज्या बातम्यामहाराष्ट्र
राधानगरी : तुरुंबे येथील थेट पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करा ; नागरिकांची मागणी

तुरंबे प्रतिनिधी : अरुण भारमल
राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावामधे आज सकाळी थेट पाईपलाईन फुटल्याचे दृश्य गावातील नागरिकांना पाहायला मिळाले आहे.पाईपलाइन फुटल्यामुळे आतापर्यंत लाखो लीटर पाणी वाया गेले आहे.लवकरात लवकर थेट पाईप लाईनचे दुरुस्तीचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत चालू करावा अशी मागणी तूरंबे गावातली नागरिकांकडून व्यक्त होत आहे.