ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरी येथे मोफत आयुर्वेदीक आरोग्य शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद

नेसरी : पुंडलीक सुतार
अर्ध सैनिक वेल्फेअर ट्रस्ट/ कॅन्टीन व सामाजिक कार्य समिती नेसरी यांचे मार्फत विजेता फाउंडेशन डॉ. संतोष फाटक आयुर्वेदाचार्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज नेसरी येथे मोफत आयुर्वेदिक आरोग्य शिबीराचे सरपंच गिरिजादेवी शिंदे नेसरीकर व ग्रापंचायत सदस्य स्नेहल नावलगी, यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या आयुर्वेदिक आरोग्य शिबिरामध्ये ६०० लोकांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिराचे आयोजन अर्ध सैनिक कॅन्टीन नेसरी येथे बाळासाहेब नावलगी यांनी आयोजन केले.यावेळी आरोग्य अधिकारी सुनील दळवी,उमेश सोलापुरे ,आनंदा शिंगे ,चंद्रकांत लषकरॆ,आनंदा विष्णू सुतार (कोलिंद्रे),आदींनी मार्गदर्शन केले.
यावेळी बाळासाहेब नावलगी ,आपासाहेब कुंभार ,रवींद्र हिडदुगी ,अमोल बागडी , सुरेश गवळी , चिन्मय शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.