ताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री. रवळनाथ देवाने आजरा सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याची शक्ती आणि हिम्मत द्यावी – पालकमंत्री हसन मुश्रीफ

आजरा सहकारी साखर कारखाना हे स्वर्गीय वसंतराव देसाई यांनी मोठ्या कष्टाने उभारलेले शेतकऱ्यांच्या श्रमाचे पवित्र मंदिर आहे. सभासद शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला चांगला न्याय देण्यासाठी अत्यंत प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीतून त्यांनी हा कारखाना उभारला होता. त्यांच्या आणि सभासद शेतकऱ्यांच्या या भावनेचे पावित्र्य सदैव जपू. आजरा सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासद शेतकऱ्यांनी मतपेटीच्या माध्यमातून श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीवर प्रचंड विश्वास व्यक्त केलेला आहे. हा कारखाना आर्थिक अडचणीमधून बाहेर काढण्याची शक्ती आणि हिम्मत श्री. रवळनाथ देवाने द्यावी, एवढीच परमेश्वरचरणी प्रार्थना….!

कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीच्या या ऐतिहासिक विजयासाठी जे -जे कार्यकर्ते, हितचिंतक आणि सभासद शेतकरी अहोरात्र राबले. या विजयासाठी त्यांनी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी केले. तसेच; असंख्य ज्ञात -अज्ञातांनीही फार मोठे सहकार्य केले. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks