ताज्या बातम्यामहाराष्ट्र
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समरजितसिंह घाटगे यांनी दिल्ली येथे भेट घेऊन केले अभिनंदन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने मध्यप्रदेशमध्ये निवडणुकीत दैदीप्यमान यश मिळवले.त्याबद्दल शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिल्ली येथे त्यांचे अभिनंदन केले.व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आहे. या निमित्ताने कागल विधानसभा मतदारसंघात घाटगे यांच्या पाठपुराव्यातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या विकासकामांच्या उद्घाटनाचे निमंत्रण मंत्री सिंधिया यांना घाटगे यांनी दिले.
सिंधिया आणि घाटगे कुटुंबियांचे पूर्वीपासून जिव्हाळ्याचे संबंधाना उभयंतानी यानिमित्ताने उजाळा दिला.