ताज्या बातम्या
कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वसंत पालकर यांच्या शैक्षणिक साधनास द्वितीय क्रमांक

बिद्री प्रतिनिधी / अक्षय घोडके :
मुरगूड ( ता. कागल ) येथील मुरगूड विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये पार पडलेल्या कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक शिक्षक साधन गटातून विद्या मंदिर वाळवे खुर्दचे अध्यापक वसंत पालकर यांच्या ‘ टाकाऊ वस्तूंपासून प्रयोगशाळा ‘ या साधनास द्वितीय क्रमांक मिळाला. त्यांना बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रविणसिंह पाटील, मुख्याध्यापक अनिल खामकर यांच्या हस्ते पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले.
त्यांना गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर, विस्तार अधिकारी शामराव देसाई, आर. एस. गावडे, सौ. सारीका कासोटे, केंद्रप्रमुख तानाजी आसबे यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापक डी. के. मर्दाने, युवराज कोरे, राहूल कुंभार, अरुण गायकवाड, उत्तम कांबळे यांचे सहकार्य लाभले.