चंदगड : डॉ. चंद्रकांत पोतदार यांना कवयित्री शांता शेळके साहित्य पुरस्कार जाहीर

चंदगड प्रतिनिधी : रुपेश मऱ्यापगोळ
हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे कार्यरत असलेले कवी डॉक्टर चंद्रकांत पोतदार यांना सृजनगंध या समीक्षा ग्रंथासाठी मंचर जिल्हा पुणे येथील प्रतिष्ठानचा कवयित्री शांता शेळके साहित्य पुरस्कार नुकताच जाहीर झाला दरवर्षी या प्रतिष्ठानकडून पुरस्कार दिले जातात.
डॉक्टर पोतदार यांनी कविता, समीक्षा, संपादन असे अनेक प्रकारचे लेखन केले असून अनेक मान्यवर समीक्षकांनी त्यांच्या लेखनाची दखल घेतली आहे. कवयित्री शांता शेळके साहित्य पुरस्कार वितरण 24 डिसेंबर 2023 रोजी मंचर जिल्हा पुणे येथे होणार असून रोख रक्कम स्मृतिचिन्ह सन्मानपत्र,सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉक्टर पदर यांना यापूर्वी अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दौलत विश्वस्त संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य बि.डी.अजळकर यांनी अभिनंदन केले.