संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथे तरुणाची आत्महत्या

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा लढा निर्णायक स्थिती आला असताना आणखी एका तरुणाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी (suicide) आत्महत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथे ही घटना घडली आहे. विजय पुंडलिक राकडे असे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
मराठवाडा हे मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू बनला आहे. याच मराठवाड्यातील अनेक तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आहेत. त्यात आता फुलंब्रीतील तरुणाने देखील आपली जीवन यात्रा संपवली आहे. विशेष म्हणजे विजयने गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली आहे. ऐन विधानसभा अदिवेशन सुरू असताना आणि अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना झालेल्या या (suicide) आत्महत्येमुळे राज्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.
शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच आत्महत्या
मिळालेल्या माहितीनुसार, विजय राकडे हा तरुण मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात सतत सक्रीय होता. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने त्याने अनेकदा चिंता देखील व्यक्त केली होती. याच चिंतेतून त्याने बुधवारी टोकाचं पाऊल उचललं. खामगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच विजयने विषारी द्रव्य प्राशन केलं. त्याने विष घेतल्याचे कळताच गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्याला तत्काळ फुलंब्री येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती आणखी खालवली. त्यामुळे त्याला रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
विजयने आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी…
विजयने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. मराठा आरक्षणासाठी आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने या चिठ्ठीत लिहिले होते. ही चिठ्ठी त्याचा खिशात आढळून आली आहे. या चिठ्ठीमध्ये विजयने लिहेले होते. की, “माझ्या मुलींना, मुलांना शिकवण्यासाठी मीपूर्णपणे कटिबद्ध असतानाही माझ्या मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यात त्यांच्यासाठी मी काही करू शकत नाही. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मी आत्महत्या करीत आहे.”
मराठा आरणाचा मुद्दा ऐरणीवर…
दरम्यान मराठा आरणाचा मुद्दा आता ऐरणीवर आला असून विधानसभेत देखील या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. अनेक सदस्यांनी या मुद्द्यावर स्पष्टपणे आपली मते देखील मांडली आहेत. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी सरकारकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी दुसऱ्यांदा सरकारला वेळ दिला आहे. यावेळी त्यांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही, तर पुन्हा मोठा लढा उभारू असा इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान मराठा तरुणांनी संयम राखावा आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊ उचलू नये असे आवाहन मनोज जरांगे आणि सरकारककडून वारंवार करण्यात येत आहे.