घुणकीत 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन !

घुणकी प्रतिनिधी : सचिन कांबळे
6 डिसेंबर रोजी संपूर्ण भारतातील बाबासाहेबांचे लाखो अनुयायी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 67 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर जमा होऊन त्यांना विनम्र अभिवादन करत असतात. त्याचेच औचित्य साधून आज ग्रामपंचायत मार्फत गावातील प्रतिष्ठित ग्राम सदय आणि राजकीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार लोकनियुक्त सरपंच सौ सुजाता जाधव यांच्या उप सरपंच केशव कुरणे यांच्या हस्ते सामूहिक अर्पण करण्यात आला.गावातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक यांनी देखील सामूहिक पुष्पहार अर्पण केला.
यावेळी उप सरपंच केशव कुरणे, युवा क्रांतीचे नेते, महात्मा फुले सुत गिरणीचे जनसंपर्क अधिकारी ग्राम सदस्य रमेश पाटोळे, सर्व ग्राम सदस्य संजय गुरव, संदीप केर्ले, मा उपसरपंच अविनाश हराळे, इतर संस्थेचे पदाधिकारी इत्यादी उपस्थितीत होते.