ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरी : हेब्बाळ जलद्याळ ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी सुरेखा नाईक

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
हेब्बाळ जलद्याळ ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच पदी सौ.सुरेखा निलेश नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अध्यक्ष स्थानी मंडल निरीक्षक संजय राजगोळे होते.नूतन सरपंच सौ सुरेखा नाईक यांचा सत्कार मंडल निरीक्षक संजय राजगोळे यांनी केला.स्वागत ग्रामसेविका प्रियांका भापकर यांनी केले.
मनोगतातुन नूतन सरपंच सौ सुरेखा नाईक म्हणाल्या की उपसरपंच व सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावचा विकास साधणार असल्याचे सांगून सर्वांनी मला सहकार्य करावे असे सांगितले.आभार उपसरपंच दिग्विजय गुरव यांनी मानले.
यावेळी माजी सरपंच व सदस्य कविता चव्हाण,सर्व सदस्य,तलाठी अवधूत सातपुते,तं.अ.सुरेश नाईक,पोलीस पाटील अनिल पाटील व मान्यवर हजर होते.