‘बिद्री’त निःपक्षपातीपणे व राजकारणविरहित ऊस तोडणी- वाहतूक यंत्रणा पारदर्शकपणे राबविणार : राजे समरजितसिंह घाटगे

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
साखर कारखाना उत्तमरीत्या चालवायचा असेल तर तोडणी वाहतूक आणि ऊस विकास योजना हे दोन घटक महत्त्वाचे आहेत. स्व. राजेसाहेब व स्व.मंडलिक साहेब यांनी या दोन गोष्टींवर फोकस केला होता. हाच दृष्टिकोन ठेवून बिद्रीमध्ये सत्ता आल्यानंतर निःपक्षपातीपणे, राजकारण विरहित ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा पारदर्शकपणे राबवू. अशी ग्वाही शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
बेलवळे बुद्रुक (ता. कागल) येथे राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ , जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी आघाडीच्या नेत्यांसह उमेदवारांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री घाटगे पुढे म्हणाले,” जाणिवपुर्वक ऊस तोडणीसाठी टोळ्या दिल्या नसल्याने बाचणी सेंटरच्या कार्यक्षेत्रातील बिद्रीचा हक्काचा ७२ टक्के ऊस पूरेशी यंत्रणा न दिलेले शेतकऱ्यांनी इतर कारखान्यांकडे पाठवला. त्यातील 51% इतका ऊस एकट्या खाजगी संताजी घोरपडे साखर कारखान्यास गेला. संताजी घोरपडे कारखान्यास ऊस मिळावा म्हणून जाणीवपूर्वक यंत्रणा कमी दिली का? अशी चर्चा आहे.त्यामुळे सभासद व कारखान्याच्या नुकसानीस जबाबदार कोण ? आम्ही सत्तेवर येतात असे प्रकार थांबवू.”
आ.प्रकाश आबिटकर म्हणाले,” बिद्रीच्या टेस्ट ऑडिट मध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत.म्हणून खुद्द पालकमंत्र्यांनी सहकार मंत्र्यापर्यंत धाव घेतली. ” लय भारी “कारभार म्हणणा-या के पी पाटील यांचा स्वार्थी व हुकुमशाही कारभार उघड करीत आहोत. इथेनाॕल प्रकल्पला मी विरोध केल्याचा चुकीचा आरोप ते करीत असून यामधील त्रुटी दूर करण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत.”
खासदार संजय मंडलिक म्हणाले, ” लय भारी ” कारभार म्हणता मग आजी माजी संचालक, प्रमुख कार्यकर्त्यांसह, कारखान्याचे मालक असलेल्या सभासदांचा ऊस बिद्री कारखान्यास का? जात नाही. जर ऊसच नेणार नसाल तर मग त्याचा काय उपयोग ?.”
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील म्हणाले,
” माझ्यासारखे सहकारातील कुणाला कळतच नाही असे म्हणणा-यांचा लय भारी कारभार जवळून बघितला. ते संचालकांचे तर सोडाच, पण खुद्द त्यांच्या बाजूच्या खुर्चीत बसलेल्या व्हाईस चेअरमन यांचे सुद्धा ऐकत नव्हते. मी म्हणेन तेच खरे असा हुकुमशाही कारभार त्यांनी केला. त्यांच्या याच कारभाराला कंटाळून संधी मिळताच मी बाहेर पडलो. त्यांना आता स्वाभिमानी सभासदच सत्तेतून हाकलतील.”यावेळी बाबासाहेब पाटील राजेखान जमादार, संजय पाटील, महेश पाटील,अमर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.स्वागत वसंतराव पाटील यांनी केले.कृष्णात पाटील यांनी आभार मानले.
हमिदवाडाप्रमाणे बिद्रितही त्यांच्या कबरी बांधू
चांगल्या चाललेल्या हमिदवाडा साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोध करणाऱ्यांच्या कबरी पंधरा वर्षापूर्वीच आम्ही बांधल्या. त्याप्रमाणे त्या बिद्रीतही बांधू. एवढीच खुमखुमी असेल तर आमच्या कारखान्याची निवडणूक त्यांनी लढवावी. हमीदवड्याच्या माळावर त्यांच्या कबरी तयार आहेत.चारीमुंड्या चीत करू.असा इशारा खा.मंडलिक यांनी दिला.