ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरी : तारेवाडी येथे किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

नेसरी प्रतिनिधी :
तारेवाडी तालुका गडहिंग्लज येथे दीपावली निमित्त शिवतेज! शिवजयंती उत्सव कमिटी यांच्यामार्फत किल्ला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये एकूण 14 स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांकाचे बक्षीस ऋग्वेद सर्जेराव तूपूरवाडकर याने पटकावला द्वितीय क्रमांक गणराज रघुनाथ पाळेकर तृतीय क्रमांक साहिल सचिन पाटील चौथा क्रमांक वैष्णव शिवाजी जाधव व पाचवा क्रमांक स्वराज्य अजित देसाई यांनी पटकावला.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच प्रशांत तुरटे ,माजी सरपंच सुरेश कुराडे ,ग्रामपंचायत सदस्य गोपाल देसाई ,वनिता पाळेकर ,सावित्री तपुरवाडक, माजी पोलीस पाटील सुरेश पाटील, विलास नाईक ,राजाराम देसाई व शिवतेज, शिवजयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकारी ,ग्रामस्थ उपस्थित होते.