ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचे योगदान सरकारएवढेच : प्रा. मधुकर पाटील ; केडीसीसी बँकेत ७० व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त व्याख्यान

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचा वाटा सिंहाचा आहे. किंबहुना; महाराष्ट्राच्या प्रगतीत जेवढे योगदान सरकारचे आहे, तेवढेच योगदान सहकाराचेही आहे. उत्तम नेतृत्व आणि पारदर्शक कारभार यामुळे सहकार चळवळ गतिमान होईल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य प्रा. मधुकर पाटील यांनी केले. केडीसीसी बँकेच्या सभागृहामध्ये ७० व्याअखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे जेष्ठ संचालक बाबासाहेब पाटील’ आसुर्लेकर होते.

व्याख्यानात श्री. पाटील पुढे म्हणाले, ग्रामीण महाराष्ट्राचे रूप बदलण्याचं काम सहकार चळवळीने केले. आज महाराष्ट्राच्या मार्गावरती दिसणारे साखर कारखाने, सूतगिरण्या, पतसंस्था बँका ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाची नांदी आहे.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रगतीच्या आलेखामध्ये सहकारी चळवळीचा नंबर फार वरच्यास्थानी आहे. १९४८ ला विखे पाटील यांनी सुरू केलेला सहकार तत्वावरील पहिला साखर कारखाना असेल किंवा सूतगिरणी या सगळ्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने रोजगार -उद्योग व्यवसाय बळकट होण्यासाठी मदत झाली. अशी सहकार चळवळ पुन्हा एकदा जोमाने सुरू करण्यासाठी आणि खाजगीकरणाचे आक्रमक रोखण्यासाठी गावागावा सहकारी चळवळीचे महत्त्व समजून सांगण्यास गरजेचे आहे. योग्य नेतृत्व आणि नियोजनामुळे सहकार समृद्ध होईल. सहकार समृद्धीसाठी सर्वांचा सहभाग मोलाचा आहे.

सरकार आणि सहकार……!

श्री. पाटील म्हणाले, कोणत्याही राज्याच्या विकासाची जबाबदारी संबंधित राज्य सरकारची असते. महाराष्ट्रात सहकार नसता तर महाराष्ट्र समृद्ध झाला नसता. राज्याच्या प्रगतीत आणि विकासात्मक वाटचालीत जेवढे योगदान सरकारचे तेवढेच योगदान सहकाराचे आहे.

स्वागत व प्रास्ताविक बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. स्वाती रवींद्र कुंभार यांनी केले. आभार जिल्हा सहकार विकास अधिकारी बी. जी. साळोखे यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks