ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : लवकरच जमा होणार पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हफ्ता मिळण्यासाठीची प्रतीक्षा आता संपली आहे.
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेच्या पंधराव्या हफ्त्याची रक्कम जमा होणार आहे. पण त्याआधी लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव तपासा. यासोबतच जर तुम्ही ईकेवायसी केलं नसेल तर, ते करणं आवश्यक आहे.
त्यामुळे देशभरातील शेतकरी आपल्या खात्यात पैसे जमा होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 व्या 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.