समाजाच्या प्रगतीसाठी ज्येष्ठांनी आपल्या ज्ञानाचा वापर करावा – सपोनि दीपक भांडवलकर

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
ज्येष्ठांनी आरोग्य संपन्न जीवन जगून शतायुषी व्हावे व समाजाच्या समृद्धी व प्रगतीसाठी आपल्या ज्ञानाचा ,अनुभवाचा वापर करावा .ज्येष्ठांना आमच्या पोलीस खात्याचे सदैव सहकार्य राहील असे विचार मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी व्यक्त केले .
मुरगुड येथील ज्येष्ठ नागरिक संघास दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी ते बोलत होते .यावेळी पोलीस खात्यामार्फत ज्येष्ठांना दीपावलीचा फराळ वितरित करण्यात आला .कार्यक्रमाच्या प्रारंभी खजानिस शिवाजी सातवेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले . ,त्यानंतर संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे यांनी आपल्या प्रास्ताविकात संघाच्या कार्याची व नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली .
या कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रियांका वाकळे व त्यांचे सहकारी तसेच संघाचे उपाध्यक्ष पी डी मगदूम , सचिव सखाराम सावर्डेकर संघाचे संचालक व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते .सूत्रसंचालन प्राचार्य पी डी माने यांनी केले .तर आभार संचालक अशोक डवरी यांनी मानले .