पाटपन्हाळा येथे झाडाच्या फांद्या तोडण्यावरून चौघांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल.

कळे-वार्ताहर अनिल सुतार
पाटपन्हाळा ता.पन्हाळा येथे झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कारणावरून विजय पांडुरंग पाटील, शामराव बाबुराव पाटील, राजाराम बाळकृष्ण पाटील रा. पाटपन्हाळा तर विठ्ठल बाळकु बांद्रे पाटपन्हाळापैकी बांद्रेवाडी यांच्यावर कळे पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून याबाबतची फिर्याद नरसू दगडू कांबळे वय 63 रा.पाटपन्हाळा यांनी दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,नरसु दगडू कांबळे हे आपल्या मालकीच्या गट नंबर 601 मध्ये पिंपळाचे झाडाच्या फांद्या तोडत असताना गावातीलच विलास हरी कांबळे हे पारळी घेऊन फांदीला असलेल्या छोट्या फांद्या तोडण्यासाठी आले असता त्यांना नरसू कांबळे यांनी विचारणा केली.
त्यावेळी विलास कांबळे यांनी ग्रामपंचायतीने मला तोडायला सांगितले आहे.असे सांगितले त्यावेळी तू ग्रामपंचायतीचा कर्मचारी नाही तुझा काही संबंध नाही तु बाजूला हो असे फिर्यादी सांगत असताना जवळच उभे असलेल्या विजय पाटील ,शामराव पाटील ,राजाराम पाटील व विठ्ठल बांद्रे यांनी जाब विचारत फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या पंजावर लोखंडी गजाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली.
त्यामुळे फिर्यादी नरसू कांबळे यांच्या तक्रारीवरून वरील चौघांवर कळे पोलीस ठाण्यात जातीवाचक गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पन्हाळा -शाहुवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जे.बी सूर्यवंशी करत आहेत.