सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय नवमतदार नोंदणी मोहीम

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड व मुरगुड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नवमतदार नोंदणी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना मत नोंदणीसाठी होटर्स हेल्पलाइन च्या माध्यमातून माहिती देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार ,कार्यवाहक अण्णासाहेब थोरवत, प्रा. संभाजी अंगज, उपप्राचार्य डॉ. टी. एम. पाटील,प्रा. डॉ. शिवाजी होडगे,प्रा. डॉ.हनुमंत सोहनी, प्रा.दादासाहेब सरदेसाई, प्रा. प्रशांत कुचेकर,प्रा. विनायक माने, नगरपालिकेचे प्रतिनिधी दत्ता कांबळे व पंकज दड्डीकर आणि महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते.
स्वागत व प्रास्ताविक व उपप्राचार्य डॉ. टी.एम .पाटील यांनी केले प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले तर आभार मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी होडगे यांनी मानले.