मुरगूड – अक्कलकोट बस सेवेचे शानदार उद्गघाटन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ते अक्कलकोट या हिरकणी बसचे आज मुरगूड बसस्थानकावर प्रवासी व मुरगूडकर नागरीक यांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक बळीराम सातवेकर यांनी सपत्नीक बस चे पूजन केले. ज्येष्ठ पत्रकार व्ही. आर,भोसले यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्वांचे स्वागत केले
. मुरगूड चे माजी उपनगराध्यक्ष दगडु शेणवी यांनी प्रास्तविक केले . प्रास्तविक भाषणात त्यांनी एस टी च्या या उपक्रमाचे स्वागत केले.या बस मुळे अनेक भाविकांची तीर्थक्षेत्र सहलीची इच्छा पूर्ण होईल व परिसरातून उत्तम प्रतिसादही मिळेल असे सांगितले.
यावेळी प्रशांत शहा, बाळासाहेब मकानदार यांनीही नागरिकांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले.ही बस सेवा बंद पडू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कारण गारगोटी हून सुटणाऱ्या बसेस व मुरगूड हून बसेस यामध्ये योग्य समन्वय ठेवल्यास प्रवासी संख्या कमी पडणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रमुख उपस्थितीत किशोर पोतदार,बबन बारदेस्कर,विजय खराडे,विनय पोतदार, सातापा पाटील,अविनाश चांदेकर, राजू चव्हाण,दत्तात्रय तांबट,एकनाथ खराडे,तुषार साळोखे,कुणाल क्षीरसागर तसेच एस टी चे मुरगूड स्थानक नियंत्रक पांडुरंग लोकरे,राजू जठार,.शशिकांत लिंमकर इत्यादी मान्यवरांचा समावेश होता.
मुरगुड आदमापुर ,शेगाव, शिर्डी, तुळजापूर, पावस, गाणगापूर अशा लांब पल्ल्याच्या गाड्या सोडून तीर्थस्थळाला भेटी देऊन दर्शन घेण्याचा लाभ एसटी महामंडळाने प्रवासी वर्गाला मिळवून द्यावा अशी मागणी सानिका स्पोर्टचे अध्यक्ष मुरगुड चे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी केली आहे.
एस टी मार्फत ए.टी. एस.सागर पाटील यांनी सांगितले ही बस कोल्हापूर ,मिरज. पंढरपूर मार्गे अक्कलकोट ला सायंकाळी पाच पर्यंत पोहचेल. व त्यांनी सर्वांचे आभार ही मानले सूत्र संचालन राजु चव्हाण यांनी केले.