ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी ! माजलगाव नगरपरिषद पेटवून दिली ; बीडमध्ये आंदोलक आक्रमक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील आंदोलन आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. काही तासांपूर्वी आमदार प्रकाश सोळुंके यांचे घर पेटवून देण्यात आले असतानाच, आता बीडच्या माजलगाव नगर परिषदेमध्ये जाळपोळ करण्यात आली आहे. आरक्षणाची मागणी करत आलेल्या जमावाने माजलगाव नगर परिषदेमध्ये घुसत जाळपोळ सुरू केली. त्यामुळे नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये मोठी आग लागली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या बीड जिल्ह्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असून, आंदोलन आक्रमक होताना दिसत आहे.

बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करून जाळपोळ करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर जाळपोळ करणारं जमाव थेट माजलगाव नगर परिषदेत पोहोचलं. या जमावाने नगर परिषदेत जाळपोळ केली आहे. त्यामुळे सध्या घटनास्थळी मोठी आग पाहायला मिळत आहे. तसेच परिसरात धुराचे लोट दिसत आहे. तर, घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यामुळे सध्या माजलगाव परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks