कागल तालुक्यातील तमनाकवाड येथे लोकप्रतिनिधींना गावबंदी ; मराठा समाज आक्रमक

कागल तालुक्यातील तमनाकवाडा येथील ग्रामस्थांनी मराठा आरक्षण मिळेपर्यंत लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा एकमुखी निर्णय घेतला. गावपातळीवर बैठक घेऊन हा निर्णय घेतला. ग्रामस्थ व युवकांनी गावातून फेरी काढून जनजागृती केली. सर्व राजकीय गटाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षण मुद्दा लावून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांनी निर्णय घेतला.
स्थानिक राजकीय बॅनरबाजी, डिजिटल फलक व वाढदिवस फलक न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी सर्व निवडणुकींवर बहिष्कारही टाकणार असल्याचे गावकऱ्यांनी स्पष्ट केले. बैठकीला विविध गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आरक्षणासंदर्भात भावना व्यक्त केल्या. युवक लक्षणिय सहभागी झाले होते. युवकांनी आक्रमक होत घोषणा दिल्या. बैठकीला सरपंच डी. आर. चौगले, अर्जुन मशाळकर, सौरभ तिप्पे, शिवाजी तिप्पे, दिलीप तिप्पे उपस्थित होते.