निढोरी : पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते 1 कोटीच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा : माजी सरपंच जयश्री देवानंद पाटील यांची माहिती

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
निढोरी ता. कागल येथे 1 कोटी खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती माजी सरपंच जयश्री देवानंद पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल नाम.हसन मुश्रीफ यांचा जाहीर नागरी सत्कार व लोकनियुक्त माजी सरपंच देवानंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास गोकुळचे संचालक युवराज बापू पाटील ,जिल्हा बँकेचे संचालक भैया माने ,मुरगुड चे माजी नगराध्यक्ष बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील बिद्रीचे संचालक गणपतराव फराकटे ,गोकुळचे संचालक युवा नेते नविद मुश्रीफ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महिला सबलीकरण समिती व देवानंद पाटील वाढदिवस गौरव समिती यांच्यावतीने महिलांच्यासाठी जागर महिला शक्तीच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हास्तरीय डोक्यावर घागर घेऊन पळणे, संगीत खुर्ची, उखाणे अशा विविध स्पर्धा आयोजित केले आहेत
डोक्यावर घागर घेऊन पळणे स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे 5000 हजार 3 000हजार 2000 हजार व मानचिन्ह, संगीत खुर्ची स्पर्धा विजेत्यांना अनुक्रमे 5000 हजार 3 000 हजार, 2000 हजार व मानचिन्ह, तर उखाणे स्पर्धा विजेत्यांना अनुक्रमे 3000हजार, 2001 हजार ,1000हजार, मानचिन्ह असे पारितोषिके दिली जाणार आहेत .
सदरच्या स्पर्धा शनिवार दिनांक 28 रोजी विद्यामंदिर निढोरी येथे रात्री नऊ वाजता आयोजित करण्यात आल्या असून ज्या स्पर्धकांना भाग घ्यायचा आहे त्याने आपली नावे रणजीत खेबुडे ,सुशील जोंधळे यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन संयोजकांनी केले आहे.