बिद्रीत सामान्य निष्ठावंतालाच संधी- संजयबाबा घाटगे ; मुरगूड येथे घाटगे गटाचा मेळावा

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
बिद्री ता.कागल येथील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांची ससे होलपट झाली आहे. परंतू येथून पुढे बिद्री कारखान्याच्या निवडणूकीतून कार्यकर्त्यांची राजकिय वाताहात होणार नाही याची काळजी आपण घेवू आणि आपल्या गटाच्या सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यालाच या निवडणूकीमध्ये संधी देवू अशी ग्वाही माजी आमदार संजययबाबा घाटगे यांनी दिली. मुरगूड ता.कागल दत्तप्रसाद व्हॅाल येथे संजयबाबा घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे प्रमुख उपस्थित होते.
श्री घाटगे पुढे म्हणाले, बिद्री सहकारी साखर कारखान्यात आपल्या गटाची निर्णयाक मते आहेत. तरी देखील या कारखान्याचा आपल्या गटाला कोणताच फायदा आजपर्यत आपल्याला झालेला नाही. त्यामुळे आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांची जे निष्ठेने सेवा करतील त्यांनाच बिद्रीच्या निवडणूकीत उमेदवारीची संधी मिळेल. हे पाहता निष्ठावंत इच्छुकांनी फॅार्म भारावेत. अन्नपुर्णा शुगर हा चांगल्या प्रकारे सुरू आहे. येत्या चार वर्षात तो इतर कारखान्याप्रमाणे सर्व सुविधा देईल. लोकसभेच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरेंचा आहे. त्यामुळे आताच त्या विषयावर बोलणे योग्य नाही असेही ते म्हणाले.
अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, आपल्या कार्यकर्त्यांची सोय व्हावी अशी आपली प्रामाणिक भुमिका आहे. यासाठी बिद्रीमध्ये आम्ही निष्ठावंतानाच संधी देवू ज्यांनी आपल्या गटाची साथ सोडली अशांना यापुढे थारा नाही विश्वासघातक्य़ांची संगत करायची नाही. बाबांच्या भुमिकेवर बिद्रीचा निकाल असल्यामुळे आपल्या गटाला संधी आहे.
यावेळी दिलीप चौगले ,उत्तम टेंबुर्णे, एस,व्ही,पाटील, नारायण एक्कल,निवृती गोते,महेश पाटील,रणजित मुडूकशिवाले, रवि सावडकर,दत्ता सावंत,दतोपंत वालावलकर, धनराज घाटगे,यांनी मनोगते व्यक्त केली. मेळाव्यास धनाजी गोधडे, नानासो कांबळे,ए.वाय.पाटील, काकासाहेब सावडकर, अशोक पाटील,दिनकर पाटील आदी कार्यकर्ते शेतकरी सभासद उपस्थित होते. स्वागत दिलीप चौगले सुत्रसंचलन सुभाष पाटील आभार के.के.पाटील यांनी मानले.
लोकसभा डोळ्यासमोर ठेवा……
या मेळाव्यात ब-यापैकी सर्वच कार्यकर्त्यांनी बिद्री कारखान्यात आपल्या गटाचा उमेदवार असावा तरच ऊस उत्पादकांना न्याय मिळेल हि भुमिका मंडताना या निवडणूकीपासूनच होवू घातलेली लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्या गटाची ध्येयधोरण असावीत अशी अपेक्षा या वेळी व्यक्त केली.