ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मोठी बातमी : गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड ; तीनजण ताब्यात

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांना भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे मराठा क्रांती मोर्चाचे कार्ते असल्याचा आरोप होत आहे. यावेळी आरोपींनी जोरदार घोषणाबाजी केल्याचीही माहिती मिळत आहे.
सदावर्तेंच्या परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये असणाऱ्या घराबाहेर त्यांची गाडी उभी होती. तिथेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.
तसेच, मला वारंवार धमक्या येत आहेत, असा दावाही वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. दरम्यान, गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.