ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गगनबावडा : मणदूर येथे पूर्वीच्या वादावरून दोन गटात तुफान हाणामारी ; १७ जखमी तर ३५ जणांवर कारवाई ; परस्परविरोधी गुन्हे दाखल.

कळे -वार्ताहर अनिल सुतार

गगनबावडा तालुक्यातील मणदूर येथे पूर्वीचा वाद मनात धरत दोन गटात तुफान हाणामारी होऊन सतरा जण जखमी तर दोन्ही गटाच्या 35 जणावर गुन्हे दाखल करण्यात आले.याबाबत गगनबावडा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,सदन बाजीराव पाटील वय 35 रा. मणदूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विरोधी गटातील एकूण 17 जणांवर गुन्हे दाखल झाले असून तीन जण जखमी आहेत. त्यामध्ये दगडू बंडू जाधव ,संजय बंडू जाधव, नारायण बंडू जाधव ,लक्ष्मण बंडू जाधव, प्रकाश रामचंद्र जाधव, प्रदीप नारायण जाधव, सचिन नारायण जाधव, तानाजी लक्ष्मण जाधव, सर्जेराव कृष्णात जाधव, दिलीप विष्णू जाधव, वैष्णवी प्रकाश जाधव, विद्या दिलीप जाधव ,संगीता संजय जाधव ,मालुबाई लक्ष्मण जाधव ,तानाजी गुंडू जाधव ,विठूबाई नारायण जाधव सर्व राहणार मणदूर ता. गगनबावडा या सर्वांवर विनयभंग केल्याप्रकरणी व विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले असून १)सदन बाजीराव पाटील २)आबाजी सिताराम पाटील ३) रोहित मधुकर पाटील ४)सरदार गणपती पाटील सर्व रा. मणदूर हे जखमी झाले आहेत.

तर दुसरीकडे फिर्यादी दगडू बंडू जाधव वय 50 रा.मणदूर यांच्या फिर्यादीवरून सदन बाजीराव पाटील रा. मणदूर ,सरदार गणपती पाटील रा.कुडित्रे ता .करवीर दादासो गणपती पाटील रा. कुडित्रे, विनोद बापू पाटील रा. गोगवे ता. पन्हाळा, मानसिंग आनंदा विठ्ठेकर रा. मणदूर,बाजीराव बाळू भवड, उत्तम युवराज जोंधळेकर, गौरव गणपती शेलार ,रमेश रंगराव कोकणे रा . मणदूर पैकी पाटीलवाडी,अजित बापू मरळकर ,आबाजी सिताराम पाटील, अभिजीत मधुकर पाटील, पृथ्वीराज धोंडीराम पाटील, बाळू दत्तू पाटील, गुंडा लिंबू पाटील, दिपक गुंडा चौगुले , अरुण भिकाजी पाटील सर्व रा.मणदूर पैकी पाटीलवाडी ,उन्मेश वसंत पाटील रा .वाकरे व इतर अनोळखी चार ते पाच यांच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी व विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले असून यामध्ये तेरा जण जखमी झाले आहेत. दोन्ही कडील लोकांकडून चिव्याच्या काट्या व लोखंडी गज, लोखंडी पारळी ,खुरपे यांचा वापर करण्यात आला होता.

याप्रकरणी दोन्ही बाजूच्या १) मानसिंग आनंदा विठ्ठेकर वय 29 रा . मणदूर २) बाजीराव बाळू भवड व 32 रा.मणदूर ३)रमेश रंगराव कोकणे वय 37 रा.मणदूरपैकी पाटीलवाडी व १) संजय बंडू जाधव वय 43 २)तानाजी लक्ष्मण जाधव वय 31 ३)दिलीप विष्णू जाधव वय 40 सर्व रा.मणदूर यांना गगनबावडा पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास सपोनि दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ठाकूर व पोलीस हेड कॉन्स्टेबल सातपुते करत आहेत. एकंदरीत गगनबावडा तालुक्यातील मणदूर येथे दोन्ही गटात झालेल्या तुफान हाणामारीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks