ताज्या बातम्यामहाराष्ट्र
सोनगेत खंडेनवमी निमित्त पुरातन कालीन शस्त्र व नाणी संग्रह सोहळाचे आयोजन तर 500 हून अधिक शस्त्रांचे पूजन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सोनगे ( ता.कागल) येथे खंडेनवमीच्या निमित्ताने
पुरातन कालीन शस्त्र व नाणी संग्रह ,तसेच शस्त्रपूजन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे .अशी माहिती अमरसिंह मारुती पाटील यांनी दिली.
सातवाहन ते मुघल साम्राज्य, शिवाजी महाराज ते अलीकडील ब्रिटिशांच्या साम्राज्यच्या काळापर्यंत १८० प्रकारच्या ५०० हून अधिक शस्त्रांचे पूजन या करण्यात येणार आहे.तसेच हा सोहळा शिवराई सदन सोनगे येथे भरविण्यात येणार आहे.