निपाणी-देवगड राज्यमार्गावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुरगुड येथे रास्ता रोको आंदोलन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथे निपाणी – देवगड रस्त्यावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .जवळपास दोन तास चाललेल्या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दोन्ही बाजुंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कोल्हापूरचे डीवायसपी संकेत गोसावी व मुरगुडचे पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.गेली अनेक वर्ष मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत आहे. त्यासाठी आजवर अनेक आंदोलने झाली. तरीसुद्धा कोणत्याच सरकारने यावर ठोस निर्णय घेतला नाही. तेव्हा यासंदर्भात सरकारने आता तत्काळ ठोस निर्णय घ्यावा . यासाठी येथील सकल मराठा समाजातर्फे आज सकाळी दहा वाजता निपाणी – देवगड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुरगुड नाका येथे भर रस्त्यावर ठिय्या मांडून आरक्षणास मिळावे यासाठी घोषणा दिल्या. जवळपास दोन तास चाललेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दोन्ही बाजुंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तास आंदोलन सुरू होते. त्यांनतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेवून सोडून दिले.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुरगुड पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.त्यामुळे कोणत्याही अनुचित प्रकार घडला नाही.
यावेळी ओंकार पोतदार,जयसिंग भोसले, जगन्नाथ पुजारी , प्रा.एकनाथराव देशमुख, प्रा.चंद्रकांत जाधव ,शंकर रावण,सुहास खराडे, संजय भारमल,सुखदेव येरुडकर,दगडू शेणवी , संकेत भोसले,दत्ता पाटील (केनवडेकर),विकी साळोखे,दिग्विजय पाटील,सुधीर खाडे,बाळासाहेब पाटील (वाळवे),शिवाजीराव चौगले यांनी मराठा समाजाच्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या .या आंदोलनात सकल मराठा समाज आणि मुरगुड शहर तसेच परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.