पत्रकार सुभाष चौगले यांना डॉ.ए. पी.जे अब्दुल कलाम प्रेरणा गौरव पुरस्कार ; शोध पत्रकारितेतील कार्याची दखल

ड्रीम फाउंडेशन,जय जगदंबा माता महिला मंडळ पुणे,करुणा ग्रंथ वाचक मंडळ, अनुप्रास बहुउद्देशीय शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शोध पत्रकारितेसाठी दिला जाणाऱ्या राज्यस्तरीय डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम प्रेरणा गौरव पुरस्कारासाठी( २०२३)कुडूत्री (ता.राधानगरी) येथील पत्रकार सुभाष चौगले निवड झाली आहे.
राधानगरी तालुक्यातील कुडूत्री गावचे पत्रकार चौगले यांनी गेले २३ वर्षे पत्रकारितेतुन विविध शोध विषय हाताळले आहेत. या शोध विषयांचा प्रस्ताव फाउंडेशनकडे सादर केला होता. सर्व क्षेत्रातील केलेल्या चौफेर लेखनाची निवड समितीने दखल घेत या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या पुरस्कार निवडीचे पत्र प्राप्त झाले असून बुधवार दि १८ ऑक्टोबर रोजी पुणे येथे हा पुरस्कार सोहळा सायंकाळी ५ : ०० वा उपस्थित मान्यवर, नेतेमंडळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या आधीही पत्रकार चौगले यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या निवडीने सर्वत्र अभिनंदन होत आहे.