राज्यात पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस, कोकण किनारपट्टीवर मेघगर्जनेसह बरसणार

येत्या २४ तासांत राज्यात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. कोकण किनारपट्टीवर आज व उद्या विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, कोल्हापूरसह कोकण किनारपट्टीच्या भागात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. येथील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. कोकणात पुढील दोन ते तीन तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
१६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पाऊस
भारतीय हवामान खात्याने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १८ ऑक्टोबरपर्यंत अनेक राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार आहे. त्यानंतर थंडी वाढत जाणार आहे.